रामनगरी अयोध्या नेहमीच राजकारण्यांच्या केंद्रस्थानी राहिली आहे. याच साखळीत आज शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यासाठी रामनगरीत पोहोचलेत. त्यांच्या या दौऱ्या निमित्ताने महाराष्ट्रातून सुद्धा शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलंय. दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि नेते मंडळी दोन दिवस आधीपासूनच अयोध्येत दाखल झालेत.